बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

मुंबई | देशात सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी चालू आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काॅंग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात नेहमीच चर्चा होतं असते. अशातच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

2019 ला महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत काॅंग्रेसबद्दल सकारात्मक भूमिका मांडत आहेत. काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होवू शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यासह देशात जोरदार चर्चा होतं आहे. संजय राऊत राजकारणात नेहमीच आपल्या स्फोटक वक्तव्यांसाठी ओळखलं जातात.

आपली जुनी मैत्री सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. राज्यातील महाविकास आघाडीनं जसं सत्तेपासून भाजपला रोखलं अगदी तसंच देशात भाजपला रोखण्याची तयारी विरोधी पक्षांतर्फे करण्यात येत आहे. मात्र अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्यानं काॅंग्रसेवर टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

दरम्यान, राज्यात सध्यातरी काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकांना सामोरं जातं आहे. परिणामी देशपातळीवर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी पॅटर्नची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच शिवसेना आणि काॅंग्रेसच्या जवळीकतेच्या चर्ची सुद्धा सर्वत्र रंगल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

“आम्ही कलानी आहोत, कलानी कुणाला घाबरत नाहीत”

“माझा देखील आर्थर रोडचा दोन वर्षांचा अनुभव, गृहमंत्री असताना…”

“दिवाळीत खानांचे चित्रपट रिलीज होतात आता या दिवाळीत स्वत: खान रिलीज झालेत”

ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचं सावट! राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

देह त्यागिता कीर्ती मागे उरावी! जाता जाता पुनीत राजकुमार यांनी केलं ‘हे’ महान काम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More