बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दरडींवर गेल्या 10 वर्षांपासून उपाययोजनाच नाही; नगरविकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मुंबई | मुंबईतील चेंबूर वाशी नाका परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर दरड कोसळल्याने आज तब्बल 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देखील जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणांमध्ये राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, सध्या मुंबईमध्ये 22 हजार 483 कुटुंब डोंगराळ भागात राहत असून या सर्व नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळालेल्या माहितीच्या जोरावर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सप्टेंबर 2011 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला कृती आराखडा बनवण्याचे आदेश दिले होते. 

दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप नगर विकास विभागाने कोणत्याही प्रकारचा कृती आराखडा म्हणजेच ॲक्शन प्लॅन बनवला नसल्याचा धक्कादायक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. त्यामुळेच की दुर्घटना घडली असल्याचेही बोलले जात आहे.

डोंगराळ भागात राहणारा घरांवर दरड कोसळू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप सध्या राज्य सरकारसह महानगरपालिकेवर करण्यात येत आहे. 1992 ते 2021 या काळामध्ये तब्बल 290 निष्पाप नागरिकांचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता तरी सरकार उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More