अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर
मुंबई | अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळेही उघडत आहेत, अशी माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आली. त्यांच्या हातापायांचीही थोडीफार हालचाल होत आहे.
पुढच्या 48 तासांत व्हेंटिलेटरवर सपोर्ट काढता येऊ शकतं, असं दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर म्हणाले.
गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये, असं गोखले यांचे मित्र राजेश दामले म्हणाले होते.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत कुठलीही अफवा पसरवू नका, अशी विनंतीही दामलेंनी केली होती.
विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या 24 तासांपासून चिंताजनक आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. खूप कॉम्पिलिकेशन्स आहे, असं डॉक्टर म्हणाले होते.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.