पुढील 3 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मुंबई | गेल्या वर्षात अनेक आसमानी संकटांमुळे बळीराजा संकटात सापडला होता. राज्यात अतिवृष्टी, महापूर अशी अनेक संकटे शेतकऱ्यांवर कोसळली. राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं. त्यातच आता पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
भारतीय हवामान विभागाकडून पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात पुर्वेकडील वाऱ्यांचा संगम होत आहे. हवामान विभागाकडून नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुर्वेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 मार्च दरम्यान गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. या तीन दिवसांमध्ये पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दक्षिण महाराष्ट्रामधील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, नांदेड आणि मुंबई वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पावसाच्या सरी कोसळल्यास उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?, नाना पटोलेंचा सरकारला सवाल
फडणवीस बोलत असताना भर अधिवेशनात गिरीश महाजनांना लागली डुलकी अन्…, पाहा व्हिडीओ
“शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करीत राहू”
कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी कोविड टास्क फोर्सचा गंभीर इशारा, म्हणाले…
संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद, नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?
Comments are closed.