मुंबई | बदलतं हवामान आणि होत असलेल्या नैसर्गिक बदलांमुळे वातावरणात प्रचंड बदल होत आहेत. हिवाळ्यातील गारठयानं सगळ्यांना हैराण करुन सोडलं होतं. आता मात्र उन्हाळ्याला सुरुवात झाली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्याचा शेवटी उन्हाची चाहूल लागली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अनेक जिल्हांत उन्हाचा पारा 37 अंशाच्या वर गेला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान विदर्भात ( Vidarbha) जाणवत आहे. राज्याचा किमान तापमानात सातत्यानं वाढ होत आहे.
या तापमानात सातत्यानं वाढ होण्याची शक्यता हवामानविभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अकोला शहराचा तापमान 38.5 सेल्सिअस पर्यंत पोहचलं आहे. नागपूर, सोलापूर, नांदेड, यवतमाळ(Yavatmal), वर्धा या ठिकाणी 35 सेल्सिअसच्या वर तापमान नोदंवलं गेलं आहे.
दोन दिवसांपूर्वी निफाड गहू संशोधन केंद्रात (Niphad Wheat Research Centre) 808 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. धुळ्यात 9.9 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. उर्वरित राज्यात 12 अंशाच्या पुढं गेलं आहे. येत्या काही दिवसांत इतर राज्यात देखील हेच तापमान राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या