मुंबई | आजही अनेक अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे, या मुद्द्यांवर त्यांनी आपली मतं मांडली. तसंच छेडछाड, बलात्कार, विनयभंग या गोष्टीकडे पोलिस गांभिर्याने पाहत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, पोलिसांनी या घटनांकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. तेव्हा या अत्याचाराच्या गुन्ह्याला कुठं तरी आळा बसेल, असंही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप
-स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?
-माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप
-आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड
-कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका