बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, मुंबई बाहेरही राज्य आहे, “

नाशिक | राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना  देवेंद्र फडणवीस यांनी  राज्य सरकारचे अस्तित्वचं दिसत नाही, अशी टीका केली आहे.

महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसतं ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून महापालिकेचा अडीच वर्षाचा काळ मिळाला, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मेट्रो सुरू करावी ही नाशिककरांची इच्छा होती. नाशिकचा नियो प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. आता हेच नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल देशभरात लागू  होणार आहे. आता हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. केंद्राची मंजूरी मिळाली आणि राज्य सरकारने चालत्या सायकलमध्ये स्पोक घातला नाही तर येत्या तीन वर्षांमध्ये नियो मेट्रो सुरू होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यावरून शहर दत्तक घेतलं म्हणजे रोज महापालिकेमध्ये हस्तक्षेप करून दलाली खायची नाही. शहरामध्ये एवढी कामे झाली आहेत. येत्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले तरी आपल्याला तिघांच्या विरोधात लढण्यासाठी  हे एकत्र येतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-  

Weather Update: पुढील 3 दिवस ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

“कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत”

‘कसौटी जिंदगी की’ फेम ‘हा’ अभिनेता वयाच्या 44 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

पुरणपोळ्यांवरून राजकारण! रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, म्हणाले…

महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More