बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई | राज्यात मागील दोन दिवसांपासून बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. साकीनाका येथील पीडितेवर बलात्कार करून गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार करण्यात आला होता. पीडितेवर राजापूरच्या रूग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साकीनाका भागातील महिलेवर बलात्कार होऊन, तिचा उपचारा दरम्यान मृत्यू होणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल. मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी याविषयी बोललो आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेची संपूर्ण माहिती घेत पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. या घटनेतील पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान, साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणात जे कोण सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्य आरोपीला पकडण्यात आलं असून त्याच्याकडून माहिती घेत आहोत, असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे तरुणावर तक्रार दाखल

दिल्लीतील पावसाने मोडले सर्व रेकॉर्ड; दिल्लीचं विमानतळ पाण्यात

खोकल्यानंतर मोबाईल अ‌ॅप सांगणार कोणता आजार झालाय; जाणून घ्या अधिक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More