बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रहमानच्या मुलीच्या आवाजातही आहे जादू, पाहा दुबईतला खास व्हिडीओ

नवी दिल्ली | जगभरातील संगीतप्रेमींना आपल्या तालावर नाचवणारा संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमानची ओळख आहे. आता ए. आर. रेहमान यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी खातिजा संगीतक्षेत्रामध्ये आपली छाप सोडत आहे.  ए.आर रेहमान यांची मुलगी खतिजाने 20 नोव्हेंबरला जागतिक बालदिनाच्या निमित्ताने दुबईमध्ये आपला परफॉर्मन्स सादर केला आहे. खातिजाचा हा गायन करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

24 वर्षीय खातिजाच्या गायनाचा सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दुबईमध्ये फिरदौस एक्सपो ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात खातिजाने आपल्या शांत आवाजाने खतिजानं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.

खातिजाने गायलेलं गाणं तिचे वडिल ए.आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. खतिजाने गायलेला व्हिडीओ त्यांनी युटयूब चॅनलवर शेअर केला आहे. त्यावर ए.आर रेहमान यांनी म्हटलं आहे की, ज्यांनी खातिजा रेहमानचा परफॉर्मन्स मिस केला आहे. त्यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे. जागतिक बालदिन साजरा करताना, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ए.आर रेहमान यांनी फिरदौस ऑर्केस्ट्रा आणि दुबईमधील 2020 या कार्यक्रमातील टीमचे आभार मानले आहेत. रेहमान यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर खातिजाच्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. खतिजाने अत्यंत शांततेत गायन केलं आहे.

पाहा व्हिडीओ- 

थोडक्यात बातम्या- 

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई, मंचरमध्ये इन्कम टॅक्सची छापेमारी

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More