राळेगणसिद्धी | शेतकऱ्यांनी राजधानीत गेल्या दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन केलं आहे. मात्र सरकार जास्त गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाससेवक अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया देताना केंद्रावर निशाणा साधला.
ज्या देशात सरकार लेखी वचन देते व ते वचन पाळत नाही, अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘सामना’ ने वृत्त दिलं आहे.
आयुष्यातील शेवटचं उपोषण आपण दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे शिष्टमंडळांने अण्णांच्या घरी जात त्यांची भेट घेतली.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी आपण दिल्लीत न जाण्याची भाजपची विनंती अण्णांनी धुडकावून लावली. शेतीमालाला हमीभाव देण्यासंबंधी उच्चाधिकार समिती नेमण्याचे आश्वासन केंद्राने दोनवेळा दिले. मात्र ते आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आता आंदोलन करायचं ठरवलं असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”
कुत्र्याच्या साखळीने गळा आवळला; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल!
‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा
“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”
…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौर