नवी दिल्ली | कोरोना विषाणू येत्या काळात पूर्णपणे नष्ट होईल असं सध्या तरी दिसत नाही. तसे कोणतेही पुरावे नाहीत. लोकांना हा विषाणू आहे हे गृहीत धरूनच आपलं काम करावं लागणार आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे कोविड 19 प्रतिबंधक विशेष दूत डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटलं आहे.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असतानाच 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयाचं डेव्हिड नबारो यांनी कौतुक केलं आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण जर लवकर रोखले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. संक्रमणाचे प्रमाण कमी असतानाच ते रोखणं शक्य असतं. सध्या तरी कोरोना विषाणू नष्ट होईल असे म्हणता येणार नाही, असं डेव्हिड नबारो म्हणाले.
येत्या काळातही कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेणं, त्यांना विलग करणं, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणं, त्यांची चाचणी करणं, त्यांना अलगीकरणात पाठवणं हीच साखळी कायम ठेवावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
“जनतेच्या जीवनात अंधार असताना लाईट बंद करून दिवे लावायला सांगणं हा निव्वळ मूर्खपणा”
भारत कोरोनावर नियंत्रण मिळवणाच्या स्थितीत; केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची गुड न्यूज
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाची चेतन भगतनं उडवली खिल्ली; केली इमोजी शेअर
ना लोकांच्या वेदनेची ना लोकांची आर्थिक चिंता, मोदींची फक्त ‘शो’बाजी- शशी थरूर
देशवासीयांशी संवाद साधल्यानंतर मोदींनी केली खेळाडूंशी मन की बात
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.