बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रातील सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही”

पुणे | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती करुन त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीवर मोठे परिणाम दिसून येतील, अशा चर्चा चालू झाल्या आहेत. राजकीय वर्तुळात चालू असणाऱ्या या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज गोविंद बाग येथे माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, सहकाराबाबतचे कायदे हे विधानसभेत केले गेले आहेत. सहकाराबद्दल राज्याच्या विधानसभेत केल्या गेलेल्या या कायद्यांमध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. यामुळे केंद्रातील सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही.

तसेच मल्टीस्टेट बँका हा केंद्राचा विषय आहे. मी केंद्रात दहा वर्ष कृषी खाते संभाळत होतो तेव्हा देखील हा विषय होता. त्यामुळे सहकार मंत्रालय हा विषय काही नवीन नाही, असं देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रातील सहकार खात्याकडे आम्ही सकारत्मकतेने पाहत असल्याचं म्हटलं आहे. अमित शहांना  काही चांगलं काम करावसं वाटत असेल, त्यामुळे ते खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं असेल. ते सहकार क्षेत्रासाठी चांगले निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

“तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण…”

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More