बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

पुणे | गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात महिला, मुली असुरक्षित असल्याचं दिसत आहे. वारंवार स्त्रियांवरील बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. यावरुनच आता मनसे नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. फेसबुकला एक पोस्ट शेअर करत राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.

राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही, सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या मस्तीतून बाहेर या, महिलांची सुरक्षा विषय आता स्वतःच्या घरातही इतका खालच्या पातळीवर गेला असल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही बाब अतिशय गंभीर आहे, राज्याच्या निष्क्रिय महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर देखील यावर बोलायला तयार नाही, असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी तु मोठी झाली का पाहायचं असल्याचं सांगत जन्मदात्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून समोर आली. याचा उल्लेख देखील ठोंबरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

दरम्यान, लेकीवर झालेल्या बलात्काराची बातमी ताजी असताना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार झाला. सरकारने यावर गंभीर व्हावं नाहीतर खळखट्याक अटक आहे, असं मनसे नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

पाहा पोस्टः

थोडक्यात बातम्या-

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आता ‘या’ वेळेपर्यंत राहणार खुली; वाचा काय आहे नवी नियमावली

लोकप्रिय आमदार निलेश लंके लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर!

‘बांगलादेशाप्रमाणेच मुंबईतही हिंदू असुरक्षित; मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार”

‘ब्लू फिल्म्स पाहणाऱ्या RSS कडून शिकण्यासारखं काहीच नाही’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More