बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपत नाही”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde). आज त्यांचा जन्मदिवस असून अनेकजण भावूक शुभेच्छा देताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर भाजपवरही हल्लाबोल केला आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा एकही नेता आज भाजपत दिसत नसल्याचं म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती रहावी यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याचं राजकारण वेगळं असतं. राज्याचं राजकारण समजणारा, ज्याच्याशी संवाद साधता येईल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपत दिसत नाही.

दरम्यान, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केल्याचं पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या – 

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! केली होती ‘ही’ मोठी घोषणा

मोठी बातमी! आज होणारी म्हाडाची परिक्षा रद्द, आता ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More