बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा नाही’; केजरीवाल सरकारनं केंद्राकडे मागितले ‘इतके’ हजार कोटी

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता रिकामी झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारनं केंद्र सरकारकडे 5,000 कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळं दिल्ली सरकारची 85 टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे, असं उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून 5000 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर केंद्राच्यावतीनं राज्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीची रक्कमही दिल्लीला अद्याप मिळालेली नाही, असं सिसोदिया यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारच्या तिजोरीत आता पुरेसा पैसाच शिल्लक राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरजेच्या खर्चांसाठी सरकारला 3,500 कोटी रुपयांची गरज भासते मात्र आत्तापर्यंत एकूण 1735 कोटी रुपयांचाच महसूल गोळा झाल्याची माहिती आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

पीएम केअर फंडला भरभरुन मदत; मात्र त्याबद्दल माहिती द्यायला पीएमओचा नकार

‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More