बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोव्यात जाण्यासाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्टची गरज नाही; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

पणजी | सर्वांचं आवडतं असणारं पर्यटन स्थळ गोवा आता पर्यटकांसाठी खुलं झालं आहे. गोव्यात परदेशातून सुद्धा लोक फिरण्यासाठी येतात. खुशखबर म्हणजे आता येथे येण्याऱ्या कोणालाही कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. मात्र गोवा सरकारने पर्यटकांसमोर एक अट ठेवली आहे.

गोव्यामध्ये फिरण्यासाठी तसेच व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांना आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य नसून गोवा सरकारने एक अट पर्यटकांसमोर ठेवली आहे. यादरम्यान गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाच्या लसचे दोन्ही डोस घेतले असले पाहिजे. या लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

गोव्यात संक्रमण दर 6 टक्के इतका आहे तर रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. याबाबतची सर्व माहिती राज्य सचिवालयात बातचीत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली असून गोव्यातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा वाढवण्यासाठी खासगी लॅबसोबत चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिंएट समोर आल्यानंतर सीमा भागांवर अधिक कडक लक्ष दिलं जात आहे. गोव्यात अद्याप एकही डेल्टा प्लस व्हेरिंएटचा रुग्ण आढळला नाही.

थोडक्यात बातम्या-

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये आढळलं ‘हे’ नवीन गंभीर लक्षण

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More