बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

मुंबई  | भाजप नेते अनेक वेळा राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्त्वाला मंजुरी दिली होती. यावरूनही भाजपने राज्य सरकारवर टीका केली होती. आता भाजपच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपने (BJP) राज्य सरकारवर टीका करताना राज्यपालांच्या अधिकारावर गदा आणली जात असून लोकशाही विरोधात निर्णय घेतले जात असल्याचं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी 12 आमदारांच्या रीतसर प्रस्तावावर वर्षभर निर्णय न घेणे कोणत्या लोकशाहीत बसते, असा प्रश्न विचारत भाजपला टोला लगावला आहे.

लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यानी 12 आमदारांची यादी पाठवली होती. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. ते कशात बसते? हे लोकशाहीत चालते का? असा सवाल करत अजित पवारांनी भाजपला चांगलच धारेवर धरलं आहे. शिवाय काही लोकांना आरोप करण्याशिवाय काही कामच उरलं नसल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, कुलुगरूंच्या निवडीसंदर्भात समितीने सुचवलेल्या नावातून दोन नावे राज्य सरकार राज्यपालांकडे पाठविणार असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

कर्जतचं राजकारण तापलं! ‘शरद पवारांचा वारसा असूनही…’, चंद्रकांत पाटलांचा टोला

आनंदाची बातमी! सीरमच्या ‘कोवोवॅक्स’ लसीला WHO ची मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More