बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कोरोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही. शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा त्या जवानासारखाच आहे. इथे मला लष्कर आणायचं नाही. कोरोनाशी लढा आपण सगळे मिळून देत आहोत. ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

लॉकडाउन म्हणजे गतिरोधक आहेत. आपण कोरोना विषाणूची गती रोखली आहे. मात्र त्याची साखळी तोडण्यात आपण अजून यशस्वी झालेलो नाही. आपल्याला ही साखळी तोडून हे संकट संपवायचं आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीस आणि डॉक्टर यांच्या रुपात देव आपल्यासोबत आहेत हे मी वारंवार सांगतोय तसंच मी डॉक्टरांनाही सांगतो आहे की कोणताही गलथान कारभार सहन करणार नाही. दिरंगाईला क्षमा नाही. सगळं चांगलं असताना आम्हाला कारवाई करण्याची वेळ आणू नका असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

स्थलांतरित कामगारांकडून प्रवासी भाडं आकारु नये- प्रकाश आंबेडकर

CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ठाकरे सरकारने प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला- किरीट सोमय्या

“सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटल्याने माझा आत्मविश्वास आणखी दुणावला”

कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More