बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर एक कुरिअर बॉय आणि त्याच्या चिमुकल्या लेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल हा कुरिअर बॉय आपल्या मुलीला सांभाळायला कोणीच नाही म्हणून स्वत:सोबत सगळीकडे फिरवत आहे. एका डिलिव्हरी बॉक्समध्ये बसलेली या माणसाची चिमुकली तुम्हाला दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चीनमधील दोन वर्षांची ली फेईर ही मुलगी ती सहा महिन्यांची होती तेव्हापासून तिच्या वडिलांसोबत दररोज नोकरीच्या ठिकाणी जात आहे. तिचे वडील तिच्याबरोबर बाईकवरुन शहरभर फिरतात. म्हणून तिला डिलिव्हरी बॉक्समध्ये ठेवतात. ली ही खूप क्यूट आणि सकारात्मक आहे. कारण तिचे हास्य पाहून तिच्या वडिलांना काम करण्याची नवी उम्मेद मिळते, असं तिच्या वडिलांनी सांगितलं.

डिलिव्हरी बॉक्समध्ये डायपर व फीडिंग बॉटलसोबत मऊ गादीसुद्धा असते. कुरिअर बॉयने आपल्या मुलीला कामात असताना तिची देखभाल करण्यासाठी डिलिव्हरी बॉक्समध्ये, तात्पुरते पाळणा घेऊन जाण्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कुरियर बॉयनं स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी आपल्या मुलीसह शहरभर डिलिव्हरी करतो. काही कारणांमुळे मी फेईरला सोबत घेऊन मे 2019 मध्ये काम करण्यास सुरवात केली, असं त्याने सांगितलं.

दरम्यान, सुरुवातीला फेईर जेव्हा आपल्या मुलीसह लोकांना अन्न पुरवायचे तेव्हा तिला काही मीटर अंतरावर ठेवायचे. कारण लीसोबत पाहिल्यानंतर लोक काय म्हणतील याची त्यांना कल्पना नव्हती. तुम्ही मुलीसोबत डिलिव्हरीसाठी का येता? तिची आई कुठे आहे? असे प्रश्न मला लोकांनी विचारू नये असं वाटत होतं.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

भारताच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; मोदींनी फोनवरून दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More