बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंसारखा बाडगा आणि बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”

मुंबई | केंद्र सरकारने महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या 4 नवीन मंत्र्यांना महाराष्ट्रात विशेष कामगिरीसाठी धाडलं आहे. हे मंत्री महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा या जनआशिर्वाद यात्रेचा उद्देश आहे. परंतु आता याच जनआशिर्वाद यात्रेमुळं नारायण राणे आणि शिवसेना आमने सामने आल्याचं पहायला मिळतंय.

नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेची सुरूवात 19 ऑगस्टपासून होणार आहे. मुंबईतून त्यांच्या या यात्रेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे भाजपने या यात्रेसाठी मोठी तयारी सुरू केली आहे.या यात्रेवेळी ते दादरमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलंय.

नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणेंसारख्या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा देखील विनायक राऊत यांनी दिलाय.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता, नारायण राणे यांची ही जनआशिर्वाद परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे आता शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा हा भाजपचा मास्टरस्टोक ठरू शकतो. त्यामुळे शिवसेना देखील विरोध करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

“बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या”

शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात

“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More