बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान देखील दिलं आहे.

कितीही आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहता की, शिवसेना असेल ठाकरे परिवार असतील. अगदी पवार साहेबांच्या कुटूंबापासून सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी धमक्या येत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

उद्धवजी यांनी मला सांगितलं आहे की, सत्य जनतेसमोर येऊ द्या. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. बाहेरची लोक आमच्या मुलींकडे पाहणार, भाजपची लोक टाळ्या वाजवणार, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काहीही करा हे सरकार पडणार नाही. तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर मला द्या. असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला पोहचल्याचं दिसत आहे. माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून आम्हाला त्रास दिला जात आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट

“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More