Top News राजकारण

आरे वनाविरोधी असलेल्या लोकांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही- जयंत पाटील

मुंबई | कांजूरमार्ग कारशेड जागेला कोर्टाने स्टे दिला असला तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत.

जयंत पाटील म्हणाले, “आरे वनाच्याविरोधी जे लोक आहेत त्यांना उकळ्या फुटण्याचं काही कारण नाही. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही.”

“ती जमीन सरकारची आहे की नाही त्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यासाठी कोर्टाला वेळ हवा आहे म्हणून त्यांनी तात्पुरता स्टे दिलेला आहे. याबाबत अंतिम तारीख फेब्रुवारीमध्ये आहे,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलंय.

“राजकीय हितासाठी काही लोक आकांडतांडव करत आहेत. प्रत्येकाला प्रत्येक निर्णयात राजकारण करायचं असेल तर त्याला काही इलाज नाही,” असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या-

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या