बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

मुंबई | शहा यांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगलं करतील. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

अमित शहा हे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्रात काही चांगलं काम करावसं वाटत असेल, त्यामुळे ते खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं असेल. ते सहकार क्षेत्रासाठी चांगले निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो, असंही राऊत म्हणाले.

सहकार हा राज्याचा विषय आहे. राज्याच्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही हे पवारांनी सांगितलं आहे. पवारां एवढा सहकारावर अधिकारवाणीने बोलणारा नेता आणि तज्ज्ञ नाही, असं सांगतानाच महाराष्ट्रात सहकार चांगला आहे. कुणाला महाराष्ट्राचं हे चांगुलपण पाहावंसं वाटत नसेल तर मग पाहू, असा इशाराही राऊतांनी दिला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्यांचा आहे. सहकार कायदे बनविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेने कायदेही केले आहेत, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

तरूणाने संपूर्ण पाठीवर काढला शरद पवार यांचा टॅटू !

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More