भारतात देशात इस्लामला कोणताही धोका नाही- मोहन भागवत
वाशिम | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भागवत यांनी आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही हिंदू धर्माची आहे. या देशात इस्लामला कोणताही धोका नाही, असं म्हटलंय.
मोहन भागवत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.
भागवत यांनी हिंदू, मुस्लिम, इस्लामवर बोलत आपलं मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी एलजीबीटी समुदायावर ही भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरूये.
हिंदू आणि मुस्लिम हे धर्म नसून हे चुकीचं नाव आहे. धर्म एकच आहे तो सनातन आहे. तो सृष्टीची धारणा करणारा शाश्वत नियम आहे. तो कधीही बदलत नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.