‘राजकारणाचं काही खरं नाही’, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पत्रक काढत कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं होतं. या पत्रकातून त्यांनी पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर शेअर केल्यावर पक्षातून हाकलपट्टी केली जाईल, असा थेट इशाराच कार्यकर्त्यांना दिला होता.
राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतरही आता पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे(Vasant More) यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यावरून सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे.
वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी सोशम मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याला एक कॅप्शन दिलं होतं. राजकारणाच काय खर नाही. निवडणुका ही लोकं कधी घेतील माहित नाही, जरा उद्योग व्यवसायाकडं लक्ष केंद्रीत करतो, अशा आशयाचं हे कॅप्शन होतं.
दरम्यान, वसंत मोरेंनी बऱ्याचदा आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तसेच मोरेंनी अप्पा आखाडे यांना खडकवासला मतदारसंघातून पक्षाने पद देण्याची मागणी फेसबुक पोस्टद्वारे केली होती. त्यामुळं राज ठाकरेंनी काढलेले पत्र हे वसंत मोरेंनाच उद्देशून होतं, अशा चर्चा आहेत.
त्यातच आता वसंत मोरेंनी पुन्हा अशी पोस्ट केल्यानं सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.