Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

पुणे | सध्या पुण्यात कोरोना विषाणु वेगात सगळीकडे पसरत आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परंतू पुण्यातील दिव्य कुंज सोसायटी आणि कृषी सोसायटीमध्ये एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.

गोखले रस्ता, तांत्रनिकेतन कॉलेजच्या शेजारी, मॉडेल कॉलिनी, शिवाजीनगर येथे असलेली दिव्य कुंज सोसायटी आणि सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर येथील कृषी सोसायटी या दोन सोसायट्यांमधी एकही कारोना रुग्ण नाही. या सोसायट्यांमधील प्रत्येक नागरिक स्वत:ची काळजी स्वत: घेत असल्याचे समोर आलं आहे.  मास्क वापरणे, नियमित हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे इत्यादी नियमांचे पालन या सोसायटीमधील नागरिक करत आहेत.

तसेच काढा करुन पिणे, घरगुती उपाय करणे, बोलताना एकमेकांमध्ये अंतर ठेवणे यासह इतर नियमांचेही पालन नागरिक करत आहेत. दिव्य कुंज आणि कृषी या दोन सोसोयट्या 45 वर्ष जुन्या असल्यामुळे या सोसायट्यांमध्ये बहुतांश जेष्ठ नागरिक राहतात.

दरम्यान, गोखलेनगर परिसरात काही मुलं विनामास्क, विनाकारण सोसायटीच्या रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याची आम्हाला भिती वाटते. सोसायटीकडे येताना पूर्वी रस्ते होते. ते आता काढले असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असं कृषी सोसायटीचे चेअरमेन सतिश सांडभोर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

“स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं”

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या