बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लाच घेणं काही चुकीचं नाही, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो’; भाजप आमदार बरळल्या

भोपाळ | लाच घेणं आणि लाच देणं हा कायद्यानुसार गु्न्हा आहे. असं असताना देखील मध्य प्रदेशातील महिला आमदारांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशातील पथरिया मतदारसंघाच्या बसपाच्या महिला आमदार रामबाई यांनी लाच घेण्यात काही चुकीचं नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

पथरियाच्या मतदार संघातील सताऊआ गावातील काही नागरिकांनी रोजगार सहाय्यक आणि सचिवांवर लाच घेतल्याचा आरोप केला होता. गावातील लोकांनी आमदार रामबाई यांच्याकडे त्यांची तक्रार देखील केली होती. यावेळी लाच घेण्यात काही चूक नसल्याचं रामबाई यांनी म्हटलं होतं. मात्र लाच ही एक हजार रुपयापर्यंत असावी, पाच दहा हजारांची घेणे चुकीचा असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

लोकांच्या तक्रारीवरून रामबाई यांनी सताऊआ येथे रोजगार सहायक निरंजन तिवारी आणि सचिव नारायण सुर्वे यांना चौपालमध्ये बोलवलं. या वेळी लोकांनी त्यांच्यावर पाच हजार तर काहींनी दहा हजार घेतल्याचा आरोप केला. यानंतर रामबाई यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच खरडपट्टी काढली.

दरम्यान, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो मात्र इतका चालायला नको 1 हजार घेतले असते तर चालले असते दीड लाखांच्या घरासाठी पाच ते दहा अत्यंत चुकीचं असल्याचं यावेळी रामबाई यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मध्य प्रदेशात राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

तळीरामांचे वांदे! लस घेतली तरचं मिळणार दारू; ‘या’ जिल्ह्यात राबवली भन्नाट कल्पना

“संजय राऊतांनी ईडीला तब्बल 55 लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं”

RSSवर टीका केल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने पाठवली नोटीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More