देश

शेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच

नवी दिल्ली | तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये काल बैठक झाली. मात्र ही बैठक देखील निष्फळ झाली.

कालची सातवी बैठक जवळपास पाच तास चालली. बैठकीत विद्युत शुल्काबाबत प्रस्तावित कायदे आणि पराली कायद्याबाबत मात्र सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र शेतकरी संघटनेचे नेते नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर मात्र ठाम राहिले.

4 जानेवारीला पुन्हा बैठक होणार आहे. काल झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला पर्याय देण्याबाबत म्हटलं आहे.

चार विषयांपैकी दोन मुद्यांवर सहमतीनंतर 50 टक्के समाधान झालं आहे. बाकी दोन मुद्द्यांवर 4 जानेवारीला चर्चा होईल. तीन कृषी कायदे आणि एमएसपीसंदर्भात चर्चा सुरु आहे, असं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! कराडच्या प्रगती शर्माने पटकावलं 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज

तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या