“मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी अन्…”
औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं आहे. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या पेनड्राईव्ह बॉम्बने गाजवलं. त्यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुलीवंदनच्या दिवशी महाविकास आघाडीवर टीकेचे फवारे उडवले आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवस असल्याने कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते.
रावसाहेब दानवे यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे कान पकडले पाहिजेत. मात्र, शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शाब्दिक हल्ला केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडत असताना घराबाहेर पडून काम केलं पाहिजे, असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. पण, जे दाऊदला मदत करतात हे त्यांना मदत करत आहेत, असा घणाघात रावसाहेब दानवेंनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आरोप असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. रावसाहेब दानवे यांनी बोलताना त्यांच्या वाढदिवसावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझं नेहमीच कलरफुल असतं. मी कधीचं वाढदिवस साजरा करत नाही. लहानपणी आम्ही होळी साजरी करायचो. गोवऱ्या गोळा करायचो, ज्यांच्यासोबत भांडण होतो त्याच्यासोबत बोंबा ठोकायचो, अशा आठवणी रावसाहेब दानवे यांनी सांगितल्या आहेत.
थोेडक्यात बातम्या-
“नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपलाय, आता…”
“आम्ही पुन्हा 5 वर्ष सत्तेत राहू, भाजपच्या दंडात ताकद असेल तर…”
ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ
“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”
मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश!
Comments are closed.