मराठीचा आग्रह जरुर धरा, मात्र सक्ती करता येणार नाही!

बडोदा । मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रह जरूर असला पाहिजे, मात्र त्याची सक्ती करता येणार नाही, असं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. ते बडोदा येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाषेच्या अभिजात गरजेचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत्या असून, त्या संदर्भात केंद्र  लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे आग्रहाने मराठीचा वापर वाढवण्यावर राज्य सरकारचा भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

साहित्य संमेलनासाठीचा निधी वाढविण्यात येणारच आहे पण त्याचबरोबर त्याविषयी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठीही पुढाकार घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.