Nilesh Lanke | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल झावरे यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लंकेंच्या पीएवर झाला जीवघेणा हल्ला
या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं असून तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र हे हल्लेखोर नेमके कोणे होते, राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून राहिल यांना मारहाण करण्यात आली.
राहुल झावरे गंभीर जखमी
या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच नगर येथे त्यांना हलवण्यात येणार आहे.
दरम्यान, हमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
निकालानंतर सोन्याचे दर आपटले?; जाणून घ्या नव्या किंमती
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांना धक्का
“कॉँग्रेस संपवणारे संपले, पण कॉँग्रेस नाही”; रितेश देशमुखने शेअर केला विलासरावांचा ‘तो’ व्हिडिओ
पदातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा फोन!
‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार