बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेल्फीवरुन पतीसोबत झालं भांडण, पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

मुंबई | मुंबई येथील विक्रोळी रेल्वे स्टेशन येथे एका विवाहीत महिलेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या वडिलांनी महिलेच्या पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यादरम्यान ही आत्महत्या सेल्फीवरुन झाली असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित मृत झालेल्या महिलेचं नाव संजना शेरे असं आहे. संजना ही 27 वर्षांची होती. दोन दिवसांपुर्वी संजना आणि तिच्या पतीमध्ये सेल्फी वरुन वाद झाला. त्यावेळेस संजनाच्या पतीने तिच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि तिचा मित्र- मैत्रिणींसोबत काढलेला सेल्फी फोटो दाखवला. त्यानंतर वाद वाढला आणि संजाना तिच्या माहेरी गेली. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या संजनाने रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केली.

लेकीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यामध्ये पती संजनाला मारहाण करत असून सासरची लोक तिच्या बालीश वागण्यावरुन तिला प्रचंड त्रास देत असल्याचं वडिलांनी म्हटलंय.

दरम्यान, आत्महत्येपुर्वी संजनाने तिच्या वडिलांना आणि भावाला एक मेसेज केला होता. संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी संजनाच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 7 मे रोजी संजनाने आपला जीव संपवला. तसेच तिच्या आत्महत्येचं फुटेज स्टेशनवरील सीसिटिव्ही मध्ये कैद झालं आहे. ज्यामध्ये आत्महत्या करण्यापुर्वी संजना बराच वेळ स्टेशनवर बसली होती.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, त्यांनी राजीनामा द्यावा”

एकेकाळी शरद पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संभाजीराव काकडे यांचं दु:खद निधन

आसामच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतली शपथ

उजनीचं पाणी पेटलं! “एक थेंबही पाणी देणार नाही, अन्याय झाला तर राजीनामा देईल”

ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More