बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

पुणे | 2019 च्या विधानसभेनंतर सत्तास्थापनेसाठी झालेलं राजकारण सर्वांना माहित आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. पहाटेचा शपधविधी सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारा होता. मात्र हे सरकार काही तासात कोसळलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र आणत महाविकास आघडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला याची सल कायम मनात राहिली. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आपली सल बोलून दाखवली आहे.

जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नसल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात जाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

पुण्यात बनणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत परदेशात कमी पण भारतात सर्वाधिक!

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराच्या भावाचं कोरोनानं निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More