बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

मुंबई | सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच नानांनी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे आहे. या शोच्या ‘कर्मवीर स्पेशल’ एपिसोडमध्ये नाना पाटेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.

कोण होणार करोडपती’च्या मंचावर अभिनेते सचिन खेडेकर यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या वडिलांविषयी विचारलं होते. यावेळी नाना भावूक झालेले पाहायला मिळाले. वडिलांच्या आठवणींनीमध्ये भावूक झालेल्या नानांनी सांगितलं की, वडिलांच्या शेवटच्या दिवसांमध्ये माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. ज्यावेळी ते आजारी होते तेव्हा दुर्दैवाने आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. तेव्हा औषधालाही पैसे नव्हते. मंगेश आणि मी शेवटी केईएम हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो, असं त्यांनी सांगितलं.

माझ्या वडिलांना नाटक आणि सिनेमाचं फार अप्रूप होतं. तमाशाला बापाने मुलाला घेऊन जायचं हे किती विचित्र वाटेल. पण नाही. तू येऊन पाहा. त्या कलाकारांचा अभिनय पाहा असं ते म्हणायचे, असंही नानांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर अजूनही साधं सरळ आयुष्य जगतात. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पाटेकरांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून नाम ही संस्था सुरू केली आहे. आजपर्यंत अनेकांना या संस्थेद्वारे मदत मिळाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More