“The Kashmir Files चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती”
मुंबई | ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट जेवढा चर्चेत आला तेवढाच वादातही सापडल्याचं पहायला मिळालं. विरोधकांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगलं आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यावरून देखील हा चित्रपट चर्चेत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
दरम्यान, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये 90 च्या दशकात काश्मिरी पंडित राज्यातून बेघर झाल्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
शिवसेनेला गृहखातं हवंय?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
‘ईडीला भाजपने चिल्लर बनवलं आहे’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
“मी पुन्हा येईन असं म्हणणं देखील एप्रिल फुलच आहे”
संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा, म्हणाले…
जो बायडन यांचं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.