बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन धक्काबुक्की केली.

धक्काबुक्की करणाऱ्या या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे गोंधळी आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे, असं मलिक म्हणाले. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. मी तिथे उपस्थित होतो, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच आम्ही बोलू नये, बुरखा फाडू नये यासाठी सभागृहात वेगळं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न सुरु आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.

मंत्री जाणुनबुजून कामकाज काढून घेण्यासाठी आणि सभागृह चालू नये यासाठी गोष्टी तयार करत आहेत. परंतू त्यांनी काही केलं तरी आम्ही पुरुन उरलो आहोत. राज्य सरकारने ओबीसीच्या डेटासंबंधी ठराव मांडून पुन्हा एकदा दिशाभूल केली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

‘…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ते पत्रं लिहिलं’; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More