देशाच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार!

नवी दिल्ली | दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज दिल्लीत दाखल झाले. काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीतील या बैठकीनंतर देशातील सर्व विरोधक एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे.

शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यातील आजची बैठक ही याच रणनीतीचा भाग आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र सामावून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-