हिमाचल प्रदेश | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरीही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाही.
यासाठीच हिमाचल प्रदेशच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास थेट अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत.
देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रत्येक दिवसाला वाढतोय. अशातच नियंमाचं पालन होत नसल्याने हिमाचल सरकारने कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास वॉरंटशिवाय अटक करण्याचा निर्णय घेतलाय.
या गुह्याबद्दल 8 दिवसांपर्यंत तुरुंगवास किंवा 5000 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षकांनी दिलीये.
महत्वाच्या बातम्या-
फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय
राज्यात दिशा कायदा केव्हा लागू होणार?; मनसेचा गृहमंत्र्यांना सवाल
संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा; नितेश राणेंचा दावा
“विरोधकांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही”
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये आढळले 5 हजारांहून अधिक कोरोनाचे रूग्ण