UPI नियमांत 1 नोव्हेंबरपासून ‘हा’ मोठा बदल होणार!

New Delhi | डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये काही बदल झाले आहेत. 1 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. यूपीआय लाईट वापरणारे वापरकर्ते जास्त वेळ न घालवता पेमेंट करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देखील अलीकडेच UPI Lite ची ट्रांझेक्शन लिमिट वाढवली आहे.

कोणत्याही किराणा दुकानात किंवा इतर पेमेंटमध्ये 1 रुपये, 5 रुपये यासारख्या छोट्या रकमेचे पेमेंट करण्यासाठी वारंवार पिन वापरण्याची गरज नाही. छोट्या रकमेचे व्यवहार सहज यूपीआय लाईटद्वारे करता येतात. परंतु दररोज ठराविक व्यवहार आणि रकमेची मर्यादा होती. ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

लवकरच तुम्ही UPI Lite वर किमान बॅलेन्स सेट करू शकाल. जेव्हाही तुमचं बॅलेन्स या लिमिटपेक्षा कमी होते, तेव्हा तुमचे UPI Lite वॉलेट तुमच्या लिंक केलेल्या बँक अकाउंटमधून निश्चित रकमेने आपोआप भरले जाईल.

रिचार्जची रक्कम देखील तुमच्याद्वारे सेट केली जाईल. या वॉलेटची लिमिट 2,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. UPI Lite अकाउंटवर एका दिवसात पाच टॉप-अप्सना अनुमती दिली जाईल.

UPI Lite वॉलेटची दैनिक खर्च लिमिट 4000 रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI Lite ची कमाल व्यवहार लिमिट 500 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. याव्यतिरिक्त, UPI Lite वॉलेटची लिमिट देखील 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये करण्यात आली आहे.

दरम्यान, गुगल पे, फोनपे, पेटीएमसह विविध यूपीआय पेमेंट अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना हे लागू होईल. जे सर्वजण यूपीआय अॅपचे लाईट पेमेंट सिस्टम वापरतात त्या सर्वांना नवीन नियमाचा फायदा होईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

तिजोरीत ‘या’ 3 वस्तू ठेवा; धन-संपत्तीत होईल वाढ

जब्याला मिळाली शालू!, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे अडकणार लग्नबंधनात?

दादांचा शिलेदार कोंडीत, सुनील शेळकेंच्या अडचणी आणखी वाढल्या

मोठी बातमी! प्रचाराला निघालेल्या ठाकरेंच्या ‘या’ उमेदवाराला हृदयविकाराचा झटका

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल