बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकीय चित्र पलटलं. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने राजकीय इतिहासामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यातच विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकार अंतर्गत वादाने कोसळेल, असे दावे केले जात आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. आघाडीचे नेते एकापाठोपाठ तुरूंगात जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून जावं लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पोलिसांकडून मदत मिळाली होती, असा खुलासा दिल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे तो सहन करणार नाही, असं सांगितलं आहे. काल पुण्यात किरीट सोमय्यांचा सत्कार करून भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस दाखल करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”

“शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो… भाजपने पाठीत खंजीर खुपसला”

“महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना कवडीचीही किंमत देत नाहीत, शरद पवारांनी…”

फडणवीस म्हणतात, “संजय राऊतांना कोण घाबरतंय, पाचवीतील मुलंही…”

किरीट सोमय्यांचा सत्कार केलेल्या पायऱ्यांवर काॅंग्रेसनं शिपडलं गोमूत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More