बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…'”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

नवी दिल्ली | कोरोना विषाणू (Corona virus) पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत आहे. भारतातही कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सध्या प्रशासन कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यातच विषाणूशास्त्रज्ञ डॉ. गगनदिप कांग (Dr.Gagandip Kang) यांनी कोरोनाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

“कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण हा एक श्वासोच्छवासातून पसरणारा आजार आहे. असेच विषाणू बराचं काळ हवेत राहतात. आपण SARS-COv2 विषाणूबरोबर जगणं शिकलं पाहिजे,” अशी धक्कादायक माहिती डॉ. कांग यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे.

कांग यांनी लहान मुलांना कोरोनाची भीती नसल्याचंही सांगितलं आहे. “आपण मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे मुलांमध्ये कोरोनाचं संक्रमण फारसं गंभीर नसतं. भारतात बुस्टर डोस म्हणून कोणती लस वापरली जावी, याबद्दल खूप कमी डेटा आहे,” अशी माहितीही कांग यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, देशात सध्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूने देखील प्रवेश केला आहे. प्रशासन ओमिक्रॉनला रोखायचं कसं? या विचारात असतानाच आता कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत”

“कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला भाजप जबाबदार”

महाविद्यालये बंद करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

ओमिक्रॉननंतर आता ‘या’ नवीन विषाणूची दहशत, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More