बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय”

मुंबई |  शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधल्याच पाहायला मिळालं आहे. मोदी आणि शहा यांच्याशिवाय भाजपमध्ये इतर कोणाचं ऐकलं जातं का?, असा सवाल उपस्थित करून सामनातून भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. मोदींशिवाय भाजपकडे जिंकून देणारा दुसरा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहऱ्यांनी उगीच फडफड करू नये असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना सुनावंल आहे. शिवाय सात वर्षात जनतेचा विश्वास जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती, असाही टोला राऊतांनी अग्रलेखातून लगावला आहे.

घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही भाजपला चांगलच धारेवर धरलं आहे. हा पक्ष एकाच कुटूंंबाच्या हातात नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण भाजपमध्ये मोदी आणि शहांव्यतिरीक्त अन्य कुणाचं बोलणं ऐकल जातं का?, असा सवाल उपस्थित करून ‘व्यक्तिकेंद्रीत आणि कुटुंबकेंद्रीत यात फारसा फरक नसतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी जाॅईंट व्हेंचर्स करून ड्रग्जसंबधातले खोटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमतांच्या पोरांना अडकवायचे आणि खंडण्या उकळायच्या. असा नवीनच कारभार भाजपमध्ये सुरू झाला आहे. तसेच जे धोतरात कमावलं ते लुगड्यात गमावलं, असा खोचक टोलाही सामनातून लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More