बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  अशातच आता अमरिंदर सिंग यांनी या सगळ्या विषयावर मौन सोडलं आहे.

मी राजकारणात आहे. माझे स्वत:चे सिद्धांत आणि मतं आहेत हे प्रत्येकाला ठाऊक आहे, भाजपमध्येही जाणार नाही आणि अधिक वेळ काॅंग्रेसमध्येही राहणार नाही. अशा पद्धतीचं वर्तन मी सहन करू शकत नाही, असंही अमरिंदर सिंग म्हणाले.

अमरिंदर सिंग हे स्वत: चा पक्ष काढतील, अशी पंजाबच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना लोकांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेस पक्ष सोडल्यानंतर पंजाबाची शक्ती कमी होणार असल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे अमरिंदर सिंह भविष्यात काय पावलं उचलणार आहेत. त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, सध्या पंजाबच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सिद्धूंच्या समर्थनात अनेक काॅंग्रेस पक्षातील नेत्यांनी राजीनामे दिलेत.

थोडक्यात बातम्या- 

“व्वा रे बिट्या, तुला कुणी सांगितलं?; महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल”

“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

“महाराष्ट्राची जनता अनाथ झाली की काय, त्यांचं कोणीच वाली नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More