बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

मुंबई | चिपी विमानतळ उद्घाटन सोहळयासाठी राज्य सरकारकडून निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून नारायण राणेंनी निशाणा साधला आहे. यानंतर नारायण राणे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच त्यांनी मीडियाशी संवाद साधला आहे.

याबाबत बोलताना नारायण राणेंनी उद्धघाटनावेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण होणार नसल्याचं म्हटलं आहे. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री आणि नारायण राणे आज एकाच व्यासपिठावर येणार आहेत. याबाबत बोलताना बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का?, असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असं सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

थोडक्यात बातम्या-

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

पुढील 4,5 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोस्टाची बंपर योजना, महिन्याला 1500 रूपये गुंतवल्यास मिळू शकतात 35 लाख रूपये

बायकोला विमानाचं तिकीट नाकारलं म्हणून पुण्यातील पठ्ठ्याने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More