उस्मानाबाद महाराष्ट्र

आरोग्य विभागात ‘इतक्या’ हजार पदांची भरती होणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

उस्मानाबाद | राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय.

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ‘या’ दिवशी दिसणार एकाच मंचावर!

‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”

‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या