Top News राजकारण

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. यावरून भाजपाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्याने जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या आणि स्टेज लावा, असा सणसणीत टोला भाजपाचे नेते नितेश राणे यांनी लगावलाय.

यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केलंय. ते म्हणतात, “जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील.”

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असून त्यावर तेच मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा”

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?- विजय वडेट्टीवार

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या