मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आलीये. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. यावरून राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु असताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केलीये.
जयंत पाटील म्हणाले, “दिल्लीतल्या केंद्र सरकारच्या विरोधात जे कोणीही बोलत आहेत त्यांना ईडीकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येतोय. घटनाक्रम पाहिला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. मुख्य म्हणजे यातून काही निष्पन्न होणार नाहीये.”
“एखाद्याला बदनाम करून त्याला त्याला त्रास देण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जातोय. आणि राऊतसाहेब जे म्हणालेत त्यामध्ये तथ्य असणार. हे खरं आहे,” असंही जयंत पाटील म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख
मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना
अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये
“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”
‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण