Top News आरोग्य

…म्हणून अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला रद्द

पुणे | राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक ताप आणि कणकण जाणवत असल्याने त्यांनी घरीच विश्रांती करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे त्यांनी अतिवृष्टी पाहणी दौराही टाळला आहे.

अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या अजित पवार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत.

शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. पंढरपूरचा दौरा केल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी पुढील दौरा रद्द केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकल्या चपला, व्हिडीयो व्हायरल

दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या