बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ‘त्या’ निर्णयाला अजित पवारांचा विरोध; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | देशातील जनता महागाईनं होरपळत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर महागाईचं खापर फोडताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी तर आकाशाला गवसणी घातली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण त्या फोल ठरल्या. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेट्रोल आणि डिझेल दरांवरून अजित पवार यांच्या जोरदार टीका केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीला राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास अजित पवार यांनीच विरोध केल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा खरेदी खर्च वगळता इतर किंमतीचे दोन भाग होतात. त्यातील केंद्र सरकारच्या भागातून प्रक्रिया खर्च आणि इतर खर्च असतात. तर राज्य सरकार केवळ नफा कमवतं  असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचा नफा कमी होवू नये म्हणून अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या जीएसटी कक्षेत आणण्यास विरोध केला असल्याची टीका पाटलांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आलं असतं तर किंमती 30 रूपयेे कमी झाल्या असत्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, निर्मला सितारमण यांच्या नेतृत्वात जीएसटी परिषदेची बैठक झाली होती. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आणण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी याला विरोध केला होता. चंद्रकांत पाटील यांनी यावरूनच महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडल आहे.

थोडक्यात बातम्या

‘कोरोना लस मोफत दिल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले’; केंद्रीय मंत्र्याचा अजब दावा

टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याला डच्चू??? ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयची नजर

“ज्यावेळी महाराष्ट्रात ‘मावळ गोळीबार’ झाला त्यावेळेस सरकार कुठं होतं?”

“शिवसेनेचं खरंय, राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं”

गुंतवणूकदारांची दिवाळी! टाटाच्या ‘या’ कंपनीने दिला तब्बल 200 कोटींचा परतावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More