बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

ठाणे | भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. भाजप नेते अनेकदा शिवसेनेवर घराणेशाहीची टीका करत असतात. आता तर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे सर्वात ताकदवान नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर दिली आहे.

राज्याचे दिग्गज नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखण्यात येतं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होण्याअगोदर शिवसेनेच्या सत्तेची सर्व सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडं होती. परिणामी राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा प्रमुख चेहरा अशी एकनाथ शिंदे यांची ओळख बनली होती. पण अचानक 2019 ला राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील पर्यायानं सरकारमधील वजन कमी झाल्याच्या चर्चा होवू लागल्या.

भाजपकडून अनेकदा एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली. आताही भाजप आमदार नितेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं, असं वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानं भाजपसाठी एकनाथ शिंदे किती महत्त्वाचे आहेत. हे परत एकदा अधोरेखीत झालं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे राजकीय वारसदार आहेत. परिणामी त्यांच्याकडून पक्षांतर कधीच होणार नाही, असंं अनेकदा खुद्द एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘कोन है ये लोग, कहाॅं से आते है ये लोग’; आनंद महिंद्रांचा संतप्त सवाल

“नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यामुळेच…”

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More